आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे वाचले महिलेचे प्राण

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका महिलेचे प्राण वाचले आहे. महिला चालत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल जाऊन ती खाली पडली. दरम्यान तिथे असलेल्या आरपीएफ जवानाने त्या महिलेचे प्राण वाचवले.

काय आहे संपूर्ण प्रकार?

मुंबई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर ३० वर्षाची मनीता पटेल ही महिला वलसाडच्या दिशेने जाणाऱ्या चालत्या एक्स्प्रेसमध्ये चढण्याच्या प्रयत्नात होत्या. त्यावेळी तोल जाऊन ती महिला खाली पडली. दरम्यान हा सर्व प्रकार तिथे हजर असलेल्या काही प्रवासी आणि आरपीएफ जवान अमित कुमार यांनी पाहिला. आणि सतर्कता दाखवत त्यांच्या दिशेने धावले आणि त्यांना गाडी खाली येण्यापासून वाचवलं.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. मनीता पटेल यांचा जीव वाचवल्याप्रकरणी पश्चिम रेल्वेतर्फे त्यांचं कौतुक करण्यात आलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या