आरपीएफच्या प्रसंगावधानामुळे वाचले तीन प्राण

बोरीवली - पश्चिम रेल्वेच्या वापी स्टेशनवर शुक्रवारी चालती ट्रेन पकडताना एक गर्भवती महिला फलाट आणि लोकलच्या मध्ये अडकली. दरम्यान आरपीएफचे पोलीस आणि इतर प्रवाशांनी मदत केल्यानंतर महिलेचा जीव वाचला. त्यावेळी महिलेसोबत तिचं बाळही होतं. महिला स्टेशनवर काही खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी उतरली होती. तेव्हा अचानक ट्रेन सुटल्याने महिलेने चालती ट्रेन पकडली. महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत वडोदरा ते बोरीवलीदरम्यान प्रवास करत होती.

आरपीएफ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 20 जानेवारीला उषा जाधव नावाची ही महिला आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत प्रवास करत होती. दरम्यान मुलाला खाऊ घेण्यासाठी वापी स्थानकावर उतरली. तेव्हा गाडी सुटली म्हणून महिलेने तातडीने चालती ट्रेन पकडली. मात्र महिलेचा तोल गेल्याने ती रेल्वे आणि फलाटच्या मध्येच अडकली. मात्र तेव्हा आरपीएफचे पोलीस मोहित कुमार आणि सहजाद अली यांच्यासह इतर दोन प्रवाशांनी महिलेची मदत केल्यानंतर सुदैवाने महिला आणि तिच्या बाळाचा जीव वाचला.

पुढील बातमी
इतर बातम्या