खिशात पैसे नसतील तर एटीएमद्वारे होणार दंड वसूल

रेल्वे रुळ ओलांडल्यानंतर रेल्वे पोलीस कारवाई करतात. यावेळी पैसे नाहीत असं कारण प्रवाशांकडून दिले जातं. मात्र आता यासाठी रेल्वे पोलिसांनी शक्कल लढवली आहे. हा गुन्हा करणाऱ्यांकडून आता ऑनलाईन पद्धतीने दंडवसुली केली जाणार आहे. याचं पहिलं पाऊल पश्चिम रेल्वेने टाकले आहे. 

अंधेरी स्थानकावर सुरक्षा दलाच्या कार्यालयात एक मशिन बसवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. स्वाईप मशीनद्वारे ही दंड वसुली केली जाणार आहे. विशेष म्हणजे जमा झालेला दंड बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. दिवसेंदिवस रुळ ओलांडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामध्ये अनेक प्रवाशांना जीव देखील गमवावा लागला म्हणून रेल्वेने हे पाऊल उचललं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या