रेल्वेसेवा, मंदिरांबाबतचा निर्णय दिवाळीनंतरच- राजेश टोपे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) बंद करण्यात आलेली मुंबईची लाइफलाइन लोकल सेवा (mumbai local) आता सुरू करण्यात आली आहे. सुरूवातीला केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी (essential workers) धावणारी लोकल आता इतर कर्मचारी वर्गालाही वाहतूक (transport) सेवा देत आहे. परंतू, अद्याप सर्वसामन्यांसाठी लोकलचे दरवाजे बंदच आहेत. शिवाय, नागरिकांचं श्रद्धास्थान असलेली मंदिर ही बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र सर्वसामन्यांसाठी रेल्वेसेवा व मंदिर उघडण्याबाबतचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

कल्याणमध्ये राष्ट्रवादीची (ncp) बैठक व महापालिका हद्दीतील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्यमंत्री टोपे आले होते. महापालिकेतील (bmc) बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेसेवा व मंदिर उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

दिवाळीनंतर (diwali) कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे सेवा सुरू करण्याचा व मंदिरे उघडण्याचा निर्णय हा दिवाळीनंतरच घेतला जाऊ शकतो. सोशल डिस्टन्सिंग कसं पाळलं जाईल, त्यासाठी नियमावली (एसओपी) तयार करावी लागेल. तसंच, टास्क फोर्सनं त्यावर काम सुरू केल्याचंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या