ऐतिहासिक सॅण्डहर्स्ट रोड स्टेशन जमीनदोस्त होणार?

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई- ‘मरे’ चे ब्रिटीशकालीन सॅण्डहर्स्ट रोड स्थानक जमीनदोस्त केले जाणार आहे. त्यासाठी रेल्वेला अनेक बदल करावे लागणार असून, ब्रिटीशकालीन वास्तूवरच हातोडा चालवला जाणार आहे. सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गाला रेल्वे बोर्डाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठीचा खर्च, आरेखन इत्यादीवर अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. पाचव्या-सहाव्या मार्गासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने दादर स्थानकात पश्चिमेला दोन नवीन प्लॅटफॉर्म, सायन, करी रोड, चिंचपोकळीसह भायखळा स्थानकातील रचनेतही बदल केले जातील. हार्बरवर कुर्ल्यापासून डॉकयार्ड, सॅण्डहर्स्ट रोड आणि सीएसटीपर्यंत बदल करण्यात येईल. हार्बर मार्गावरील विकास कामासाठी ब्रिटीशकालीन सॅण्डहर्स्ट रोड स्थानकही जमीनदोस्त केले जाणार आहे.

या बदलामुळे हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. या विषयी महाराष्ट्र महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता रेल्वेच्या विकासकामांचं नेहमी आम्ही स्वागतच करतो. तसेच भविष्यात रेल्वे प्रवाशांची संख्या वाढेल. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पालिका प्रशासनासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा जेणेकरून ‘मरे’ प्रवाशांचे हाल होणे टळेल असेही वंदना सोनावणे म्हणाल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या