एक्स्प्रेसमध्ये दुषित पाणीपुरवठा, प्रवाशांकडून संताप

मुंबईच्या जनशताब्दी एक्स्प्रेसमधील कॅन्टीनमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. हेच पाणी रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये जेवणासाठी वापरलं जात असल्याचं देखील पुढे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वे कर्मचाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. 

एक्सप्रेसमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा

जनशताब्दी एक्स्प्रेसमधून १३ फेब्रुवारी रोजी मंडगावहून मुंबईला येणाऱ्या डी/7 डब्यातील प्रवाशांनी हा प्रकार उडेजात आणला. डब्यात चहा देण्यासाठी आलेला कॅन्टीनमधील कामगार हा चहासाठी हे दुषित पाणी वापरत असल्याचं एका प्रवाशानं पाहिलं. त्यानंतर त्यानं रेल्वेतल्या छोट्याखानीत असलेल्या कॅन्टीनमध्ये जाऊन पाहणी केली. त्यावेळी जेवणासाठीही हेच गढूळ पाणी वापरलं जात असल्याचं पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ काढून इतर प्रवाशांना दाखवला. तसंच रेल्वे प्रशासनाकडे याची तक्रारही केली. या कॅन्टीन चालकाच्या कंत्राटदारावर रेल्वेनं बंदी घालावी अशी मागणी केली.  

कंत्राटदारावर गुन्हा नोंद

चिपळूण इथं संबंधीत कंत्राटदाराविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र हा प्रवाशांच्या जीवाशी खोळ असून, रेल्वेचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप करत याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी प्रवाशांनी केली आहे.


हेही वाचा

आणखी वेगात धावणार राजधानी एक्सप्रेस!

पुढील बातमी
इतर बातम्या