बेस्टच्या भंगार बसगाड्याचा वापर फिरत्या शौचालयासाठी होणार ?

भंगार बेस्ट बसेसचा वापर फिरत्या  शौचालयासाठी करावा असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी सभागृहात मांडला.  पालिकेनं पदपथावर बांधकाम न उभारण्याचंं धोरण तयार केल्यानं रस्त्याच्या पदपथावर शौचालय उभं करता येत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्यामुळे पश्चिम आणि पूर्व द्रूतगती मार्गावर तसंच अन्य लहान मार्गांवर भंगार बेस्ट बसचा वापर, फिरते शौचालय म्हणून केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही, असा प्रस्तावर शिवसेना सचिन पडवळ यांनी सभागृहात ठेवला.  विरोधकांनी या ठरावाच्या सुचनेला तीव्र विरोध केला आहे़. 

फिऱत्या शौचालयांची मागणी

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टनं आर्युमान संपलेल्या 113 बसगाड्या वर्षभरात भंगारात काढल्या. या गाड्यांचे सुट्टे पार्टही कुठे मिळत नाही. त्यामुळे या गाड्यांचा वापर फिरते शौचालय म्हणून केल्यास नागरिकांची गैरसोय होणार नाही, असा प्रश्न शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी सभागृहात मांडला. आर्युमान संपलेल्या 113 पैकी दहा बसगाड्यांवरील बेस्टचं नाव काढून त्याचं रुपांतर फिरत्या शौचालयात करण्याची मागणी सचिन पडवळ यांनी केली. त्यावेळी पडवळ यांनी शहरातील वाहतूक कोंडी आणि पालिकेनं पदपथावर बांधकाम न उभे करण्याच्या धोरणामुळे शहरात ठिकठिकाणी शौचालयं उभी करता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोईकडे पडवळ यांनी लक्ष वेधलं. 

फिरत्या शौचालयाला विरोधकांचा विरोध

बेस्ट बसची जगभरात एक वेगळी ओळख आहे़ भंगारात काढलेल्या बेस्ट बसमध्ये फिरते शौचालय केल्यास, बेस्टच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असं मत भाजपाचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी व्यक्त केलं. तर विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ही या प्रस्तावाला विरोध केला.

पुण्यात योग्य मग मुंबई का अयोग्य

पुणे परिवहन संस्थेमध्ये या प्रकारचा उपक्रम राबवला असून तिथे काँग्रेस आणि भाजपनं त्याला मान्यता दिली आहे. मग इथेच विरोध का? असा सवाल पडवळ यांनी उपस्थित केला आहे. बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी पोलिसांनी आपल्या व्हॅनचे स्वच्छतागृहात रूपांतर केले आहे. त्याच धर्तीवर बेस्टच्या बसचा वापर करावा असे पडवळ यांनी आपले मत मांडले. 


हेही वाचा

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, पण त्या नऊ दिवसांचा पगार कट

पुढील बातमी
इतर बातम्या