बेस्ट संप : ५०० गाड्या रस्त्यावर उतरवण्याचा दावा फोल

बेस्ट संपावर तोडगा काढण्याचा बेस्ट प्रशासनाचा प्रयत्न तिसऱ्या बैठकीनंतरही अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे बुधवारी तिसऱ्या दिवशीही संप सुरूच राहणार असून प्रवाशांचे हाल सुरूच राहणार आहे. तर बेस्टच्या संपात फूट पडली असून कामगार संघटनेन संपातून माघार घेतली आहे. तर माघार घेतल्यानंतर कामगार सेनेने आपले ११००० कर्मचारी कामावर रुजू होतील. त्यामुळे किमान ५०० बेस्ट बस रस्त्यावर उतरतील असा दावाही केला होता.

पण बुधवारी सकाळी ११००० पैकी केवळ ६२ कर्मचारीच कामावर रुजू झाल्याची माहिती आहे. त्यामुळे कामगार सेनेचा ५०० बस सुरू करण्याचा दावा फोल ठरला आहे. तर कामगार सेना तोंडावर आपटल्याची चर्चा आहे.

चौथी बैठकही निष्फळ

बेस्ट संपावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी रात्री बेस्ट कृती समिती आणि बेस्ट प्रशासन यांच्यामध्ये चौथी बैठक पार पडली. मात्र ही बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे बेस्ट कृती समितीने संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने बुधवारही प्रवाशांसाठी अडचणीचाच असणार आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र प्रवाशांना बुधवारी थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता होती. कारण मंगळवारी रात्री संपात फूट पडली आहे. शिवसेनेची कामगार संघटना आणि इतर संघटनांध्ये संपावरून मतभेद झाले. त्यानंतर कामगार सेनेनं संपातून माघार घेण्याचा निर्णय घेत आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले होते. पण कामगार कामावर रूजू न झाल्याने एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही.

कर्मचाऱ्यांनी आदेश धुडकावले

त्यानुसार बुधवारी किमान ५०० बेस्ट बस रस्त्यावर उतणार आणि प्रवाशाना दिलासा मिळणार असं वाटतं होत. पण कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी हे आदेश धुडकावून लावले आहेत. कारण ११००० पैकी सकाळी केवळ ६२ कर्मचारीच कामावर आल्याची माहिती आहे. तर सकाळी मुंबई सेंट्रल इथून केवळ तीन बेस्ट बस सोडण्यात आल्या. पण कर्मचाऱ्यांचा विरोध लक्षात घेत या तिन्ही बस परत बोलावण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळपासून मुंबईच्या रस्त्यावर संपाच्या दुसऱ्या दिवशी ही एकही बेस्ट बस धावू शकलेली नाही. तर कामगार सेना तोंडावर आपटली आहे.


हेही वाचा - 

एसटी आली धावून! प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीच्या ४० गाड्या


पुढील बातमी
इतर बातम्या