देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर मुंबई ते बंगळुरू मार्गावर धावणार

मुंबईतील (mumbai) छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस (csmt) ते केएसआर बंगळुरू (bangalore) रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी ही ट्रेन भारतातील सर्वात वेगवान रात्रकालीन रेल्वेगाडी असणार आहे.

आता बंगळुरू रेल्वे स्थानकावर या वंदे भारत स्लीपरची अंतिम चाचणी होणार आहे. त्यानंतर मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरी (ICF)च्या तंत्रज्ञानाचा वापर करून BEMLने ही ट्रेन विकसित केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांमधील प्रवास वेगवान होणार असून प्रवाशांना एक प्रिमियम आणि आरामदायी पर्याय मिळणार आहे.

हुबळी-धारवाड, बेळगाव आणि पुणे मार्गे प्रवास करणाऱ्यांना या स्लीपरचा मोठा फायदा होणार आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लवकरच ही सेवा उपलब्ध होईल अशी घोषणा मे महिन्यात केली होती. पण अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की सर्व सुरक्षा चाचण्या पूर्ण करून आवश्यक मंजुऱ्या मिळवूनच ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

देशातील पहिली वंदे भारत स्लीपर जानेवारी 2026 मध्ये हावडा ते कामाख्यादरम्यान सुरू झाली होती.

या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ तब्बल सहा तासांनी कमी झाला आहे. मुंबई ते बंगळुरू प्रवासाचं अंतरही कमी होणार आहे.

सध्या ही ट्रेन दक्षिण रेल्वे किंवा भारतीय रेल्वेच्या ताफ्यात आली नसून सर्व चाचण्या पूर्ण झाल्यावरच हस्तांरित केली जाणार आहे.

यावेळी सोयीसाठी ही ट्रेन बंगळुरू स्थानकावर ठेवली गेली आहे. मुंबई ते बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन 16 डब्यांची आहे.

या ट्रेनची प्रवासी क्षमता 823 असून गाडीमध्ये 611 बर्थ असणारी 11 एसी 3 टियर (3AC), 188 बर्थ असलेले 4 एसी 2 टियर (2AC) कोट आणि 1 फर्स्ट एसी (1AC) कोच असतील.

ही ट्रेन ताशी 180 किमी वेगाने धावू शकते. रात्री प्रवास अधिक सुखद करण्यासाठी ट्रेनच्या डब्यांची रचना आरामदायी प्रवासाच्या हेतूने केली आहे.


हेही वाचा

मुंबईत 'मॅनहोल'ध्ये पडला माणूस

पावसाच्या पाण्यामुळे डोंबिवली स्टेशनचे एस्केलेटर बंद

पुढील बातमी
इतर बातम्या