पश्चिम रेल्वेवर गणेश विसर्जनानिमित्ताने विशेष लोकल

मुंबई : गणेश विसर्जनानिमित्त 15 सप्टेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर रात्री विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. 15 सप्टेंबरच्या  मध्यरात्री चर्चगेट-विरार मार्गावर या विशेष लोकलच्या 4 फेऱ्या चालवण्यात येतील. गणेश विसर्जनानिमित्त चालवली जाणारी पहिली विशेष लोकल चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने डाऊन मार्गावर रात्री 1.15 वाजता सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 3.20 वाजता सोडण्यात येईल. विरारवरुन चर्चगेटच्या दिशेने अप मार्गावर पहिली विशेष लोकल 12 वाजून 15 मिनिटांनी सोडण्यात येईल, तर शेवटची विशेष लोकल रात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सोडण्यात येईल.

विशेष लोकल वेळापत्रक : 

चर्चगेट ते विरार डाऊन

पहिली लोकल रात्री 1.15 वाजता

दुसरी लोकल रात्री 1.55 वाजता

तिसरी लोकल रात्री 2.25 वाजता

चौथी लोकल रात्री 3.20 वाजता

विरार ते चर्चगेट अप

पहिली लोकल रात्री 12.15 वाजता

दुसरी लोकल रात्री 12.45 वाजता

तिसरी लोकल रात्री 1.40 वाजता

पुढील बातमी
इतर बातम्या