वांद्रे टर्मिनस ते जबलपूरदरम्यान धावणार विशेष सुपरफास्ट गाडी

  • मुंबई लाइव्ह टीम & अतुल चव्हाण
  • परिवहन

पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनस ते जबलपूरच्यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष सुपरफास्ट ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये १७ जूनपासून विस्तार करण्यात येणार आहे. या मार्गादरम्यान होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेत पश्चिम रेल्वेने या सुपरफास्ट विशेष गाडीच्या फेऱ्या २९ सप्टेंबर २०१८ पर्यंत वाढवल्या आहेत.

या गाडीचा विस्तार

ट्रेन नं. ०१७०५ वांद्रे टर्मिनल-जबलपूर साप्ताहिक सुपरफास्ट विशेष ट्रेन

प्रवासाचा अवधी

वांद्रे स्थानकातून दर शऩिवारी मध्यरात्री १२.१५ वाजता निघणार आहे. ती रविवारी रात्री ९.४० वाजता जबलपूरला पोहचेल.

परतीचा प्रवास

ट्रेन नं. ०१७०६ जबलपूर स्थानकातून दुपारी २.२० वाजता निघून शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता मुंबईच्या वांद्रे स्थानकात आगमन.

या स्थानकावंर थांबा

बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, रतलाम, उज्जैन, वैरागढ, भोपाळ, होशंगाबाद, इटारसी, पिपरिया आणि नरसिंहपूर

'असे' असतील डबे

वातानुकूलित द्वितीय आणि तृतीय श्रेणी आणि शयनायन

१७ जून २०१८ पासून बुकिंग

रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रावरून आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावरून आरक्षण करता येईल.


हेही वाचा - 

'लाइफलाइन एक्सप्रेस्' ठरणार तारणहार

मध्य रेल्वेवर मोटरमन्सची कमतरता, अनेक फेऱ्या रद्द

पुढील बातमी
इतर बातम्या