मुंबई - राज्य परिवहन मंडळाला मार्च 2016 मध्ये 1927.77 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. याचं कारण म्हणजे प्रवासी कित्येक वेळा एसटीने प्रवास करण्यापेक्षा खासगी बसेसने प्रवास करणं पसंत करतात.
तर दुसरीकडे परिवहन मंडळाला हवं तसं यश मिळत नसल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2014-15 मध्ये 3520 तक्रारी प्रवाशांनी केल्या होत्या तर 2015-16 मध्ये 3391 तक्रारी केल्या आहेत.