एसटी प्रशासनाच्या अश्वासनानंतर एसटीचे बेमुदत संप स्थगित

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने विविध मागण्यांसाठी ३० ऑक्टोबर रोजी उपोषण सुरू केलं. जर मागण्या मान्य न झाल्यास तर, १ नोव्हेंबरपासून राज्यभरात बेमुदत उपोषणाचा इशारासुद्धा त्यांनी दिला होता. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि महामंडळात झालेल्या बैठकीनंतर पुकारण्यात आलेलं बेमुदत उपोषण संघटनेकडून तुर्तास स्थगित करण्यात आलं आहे.

आश्वासनानंतर संप मागे

बुधवारी मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि महामंडळामध्ये बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने काढलेल्या पत्रकात वेतन कराराबरोबरच चर्चा करण्यात आलेल्या मागण्यांमध्ये अघोषित संपात कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा फेरविचार करण्यात येईल, अनुकंपा तत्त्वावर स्वच्छकपदी नेमणूक देण्यात परवानगी देण्यात येईल, कर्मचाऱ्यांच्या बदल्या सेवा ज्येष्ठतेनुसार करण्यात येतील, कामगारांना देण्यात आलेल्या गणवेशासंबंधात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यात येईल, अशा प्रकारच्या अनेक मागण्या आणि काही प्रश्नांची सोडवणूक करण्याचं आश्वासन एसटीकडून देण्यात आलं आहे.

विविध मागण्या मान्य करण्याबाबत एसटी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आल्याची घोषणा संघटनेकडून करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या