एसी लोकलच्या चाचणीला सुरुवात

  • मनोज कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • परिवहन

मुंबई - मुंबईकरांसाठी पहिली एसी लोकल गेल्या मार्च महिन्यात मुंबईत दाखल झाली होती. पण गाडीतल्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी रेल्वेला सहा महिने लागले. या तांत्रिक अडचणी आता दूर झाल्या असून एक आठवडा यार्डातच या एसी लोकलच्या तांत्रिक अडचणींच्या तपासणीला गुरुवारपासून सुरुवात झाली. यातलं सॉफ्टवेअर, स्वयंचलित दरवाजे, वातानुकूलित यंत्रणा यांची चाचणी सध्या सुरू आहे.

चेन्नईच्या आर. सी. एफ. कारखान्यात ही एसी लोकल तयार करण्यात आली. गाडीची रुळांवरील चाचणी पुढच्या आठवड्यात होणार आहे. ही लोकल कुठल्या मार्गावर चालवणार आहे, हे अजून निश्चित नसलं तरी ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशीदरम्यान ती चालवण्याचा विचार मध्य रेल्वे करत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या