पहिल्या एसी लोकलची चाचणी सफल

मुंबई - मुंबईकरांसाठी दाखल झालेल्या पहिल्या एसी लोकलची चाचणी सफल झालीय. ही एसी लोकल गेल्या मार्च महिन्यात मुंबईत दाखल झाली होती. आणखी काही दिवस या ट्रेनची चाचणी सुरु होईल. त्यानंतर गाडीची रुळांवरील चाचणी घेतली जाईल. या ट्रेनची चाचणी मेनलाईन, हार्बर लाईन आणि ट्रांसहार्बर कॉरिडोर वर केली जाईल. सर्व चाचणी पार पडल्यानंतरच या एसी ट्रेनला मुंबईकरांच्या सेवेत दाखल केलं जाईल.

पुढील बातमी
इतर बातम्या