मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारपदी सुनील उडासी

मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी पदाचा भार सुनील उडासी यांनी स्वीकारला आहे. यापूर्वी ते मध्य रेल्वेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत होते.

उडासी भारतीय रेल्वेला वैयक्तिक सेवा म्हणून पाहतात. त्यांच्याकडे सामान्य प्रशासन आणि वैयक्तिक कामाचा दांडगा अनुभव आहे. याआधी त्यांनी उपाधिकारी म्हणून भुसावळ, नागपूर, सोलापूर, झांशी आणि माटुंगा वर्कशॉप या ठिकाणी काम केले आहे. तसेच त्यांनी सीएसटी येथील रेल्वेच्या मुख्यालयात सामान्य प्रशासन विभागात सहाय्यक सचिव, उपसचिव, वरिष्ठ पोलीस अधिक्षक म्हणून काम केले आहे.

ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे आणि त्यांचे संचयन करणे यात त्यांची विशेष आवड आहे. रेल्वेच्या क्रीडा प्रशासन विभागात त्यांनी मध्य रेल्वे क्रीडा असोसिएशनचे सचिव म्हणून कामगिरी पाहिली. भारतीय रेल्वे महिला क्रिकेट संघाच्या निवड कमिटीच्या अध्यक्ष पदावरही ते कार्यरत होते. रशिया येथे पार पडलेल्या यूएसआयसीआय वर्ल्ड रेल्वे स्पर्धा 2010 मध्ये भारतीय रेल्वे टेबल टेनिस संघटनेचे ते प्रमुख होते.

पुढील बातमी
इतर बातम्या