'परे' च्या १६ स्थानकांवर स्वच्छता अभियान

पश्चिम रेल्वने आपल्या स्थानकांवर स्वच्छता अभियान रावण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार विविध स्थानकांवर स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. या स्वच्छता अभियानात पश्चिम रेल्वेला मुंबईकरांचाही जोरदार पाठिंबा लाभत आहे. याचाच भाग म्हणून परेच्या १६ रेल्वे स्थानकांवर २७ ते ३१ जुलै दरम्यान ५ दिवसीय स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.

स्वच्छता जागृती

पश्चिम रेल्वेकडून 'स्वच्छ रेल्वे-स्वच्छ भारत' हा संदेश देत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलं. याकामात रेल्वे कर्मचाऱ्यांसह एनजीओ, सामाजिक संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नॅचरल स्ट्रीट्स फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनएसपीए) च्या कलाकारांनी दादर, वांद्रे आणि मलाड स्थानकावर पथनाट्यातून मुंबईकरांना स्वच्छतेचं महत्व समजावून सांगितलं. तर भायंदरच्या एस. एन. महाविद्यालतील ५० विद्यार्थ्यांनी लोकल प्रवाशांसोबत मीळून कल्याण, भायंदर स्थानकावर स्वच्छता केली. पथनाट्य पोस्टरच्या माध्यमातून संदेश देत प्रवाशांना जागृत केलं.

मुख्य उद्देश

 प्रत्येक गटात ९ कर्मचारी असे ४ गट रेल्वे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम करत होते. स्टेशनचा परीसर, शौचालय, टिकीट विभाग, पादचारी मार्ग स्वच्छ करण्यात आले. डागडुजीच्या कामामुळे पसरलेला मलबा उचलून परीसर स्वच्छ करण्यात आला. रेल्वे प्रवाशांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करणं, लोकल रेल्वे, तिचा परिसर, रुळ यावर कचरा न होऊ देणं यासाठी हे अभियान चालवण्यात आल्याचं पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या