मुंबईतून देशांतर्गत विमानसेवा 'ह्या' तारखेपासून पुन्हा सुरू

File Image
File Image

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल १ म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ १० मार्चपासून पुन्हा सुरू केले जात आहे. १० मार्चच्या मध्यरात्रीपासून टर्मिनल १ वरून देशांतर्गत उड्डाणे सुरू होतील. 

कोरोना लाॅकडाऊनमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ वरून देशांतर्गत उड्डाण मार्च २०२० पासून बंद करण्यात आली होती. १० मार्चच्या मध्यरात्रीपासून हे टर्मिनल पुन्हा स्थानिक उड्डाणांसाठी कार्यरत होईल.

हे टर्मिनल सुरु झाल्यानंतर  गो एयर, स्टार एअर, एअर एशिया यांचीही सेवा १० मार्चपासून होण्याची शक्यता आहे. टर्मिनल १ मधून या कंपन्यांची सेवा सुरु होऊ शकते. त्यामुळे प्रवाशांना विमानाने सहज उपलब्ध होतील. टर्मिनल २ पासून इंडिगोची बहुतेक उड्डाणे चालविली जातील.

विमानतळ प्रशासनाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच लाऊंज आणि एफ एन्डबी प्रवेश मिळेल. प्रवाशांना सोयीसाठी वाहतुकीचे सर्व प्रकार उपलब्ध करून देण्यात येतील.

पुढील बातमी
इतर बातम्या