AC लोकल झाली Non-AC, दरवाजे उघडे ठेवूनच ट्रेन पळवली

AC लोकल प्रवाशांसाठी त्रासदायक ठरताना दिसत आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावरील नायगाव रेल्वे स्थानकात प्रवाशांनी याचा अनुभव घेतला. वातानुकुलीत यंत्रणा बंद पडल्याने AC लोकल  नायगाव रेल्वे स्थानकात ट्रेन अर्धा तास थांबली होती. मात्र, प्रवाशांनी गोंधळ घातल्यामुळे ही AC लोकल दरवाजे उघडे ठेवून चालवली गेली. 

विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणारी एसी लोकल सोमवारी सकाळी नायगाव रेल्वे स्थानकात अर्ध्या तासाहून अधिक वेळ तात्काळत उभी होती. ट्रेनमधील वातानुकुलीत यंत्रणा अचानक बंद झाल्याने ही ट्रेन नायगाव रेल्वे स्थानकात अर्धा तास थांबली होती. यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला होता.

रेल्वेकडून होतं असलेल्या या गैरसोयीमुळे प्रवासी व मोटारमन यांच्यात वाद झाला होता. अखेर स्टेशन मास्तरने मध्यस्थी घेत समजूत काढल्यानंतर हा वाद मिटला.  

मात्र, ट्रेनची वातानूकुलीत यंत्रणा सुरुचं झाली नसल्याने अखेर या ट्रेनचे दरवाजे उघडे ठेवून ती पुढे नेण्यात आली. अर्ध्या तासाहून अधिक वेळ या ट्रेनला उशीर झाल्याने प्रवाशांना कामाच्या ठिकाणी उशिरा पोहचावे लागले. या ट्रेनमुळे पश्चिम रेल्वेवरील इतर लोकलची वाहतूक देखील विस्कळीत झाली होती.


पुढील बातमी
इतर बातम्या