मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची पहिली झलक

01/4
पुलांचे, बोगद्याचे डिझायनिंगचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. ही रेल्वे रुळावर आली, तर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर अवघ्या २ तासात पूर्ण होईल.
02/4
मुंबई अहमदाबाद या बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी २०२३-२४ ची डेटलाईन यापूर्वीच दिली गेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जपानची ही बुलेट ट्रेन आणखी मॉडीफाय करून मुंबई अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन म्हणून चालवली जाणार आहे.
03/4
बुलेट ट्रेन महाराष्ट्रातील १०८ गावातून जाणार आहे. बहुतेक गाव पालघर जिल्ह्यात आहे. संपूर्ण प्रकल्प अग्नि आणि भूकंप प्रतिरोधक असेल. भू-संवेदनशील भागात भूकंप मापन आणि पवन मोजण्यासाठी यंत्रणा बसविली जातील.
04/4
पीएम मोदी आणि त्यांचे तत्कालीन जपानी समकक्ष शिन्झो आबे यांनी १४ सप्टेंबर २०१७ रोजी या महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली होती. अशाप्रकारे, जपानचे आयकॉनिक 'शिंकन्सेन' बुलेट-ट्रेन तंत्रज्ञान विकत घेणारा भारत तैवाननंतर पहिला देश बनला.
पुढील बातमी
इतर बातम्या