मेट्रो ७ मार्गावरील प्रवास आता लवकरच सूरू होणार

मेट्रो (mumbai metro) ७ मार्गावरील प्रवास आता लवकरच सूरू होणार आहे. कारण आता दहिसर पूर्व ते डीएन नगर मेट्रो २ अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ मार्गावर ऑक्टोबर २०२१ पासून मेट्रो रेल्वे चालवण्याचं नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं (एमएमआरडीए) केलं आहे. परिनामी आता पश्चिम उपनगरवासियांचा प्रवास वातानुकूलित व वेगवान होणार आहे. 

यासाठी सोमवार ३१ मे पासून या मार्गांवर मेट्रो रेल्वेची चाचणी करण्यात येणार आहे. साधारण ४ महिने दोन्ही मार्गांवर चाचणी होईल. त्यानंतर ऑक्टोबरपासून मेट्रो रेल्वे धावणार असल्याची माहिती समोर येत आहे. मेट्रोच्या आकुर्ली स्थानकावर शुक्रवारी चाचणी पूर्व कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मेट्रो प्रकल्पाची माहिती देण्यात आली.

ऑक्टोबर २०२१ पासून दोन्ही मेट्रो मार्ग सेवेत येताच अंधेरी (andheri) ते दहिसर पट्टयातील १३ लाख प्रवाशांना फायदा होणार आहे. मेट्रोच्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गांवर वातानुकू लित चालकविरहीत मेट्रो धावेल. सध्या एक गाडी ताफ्यात असून त्याच्या दोन्ही मार्गांवर चाचण्या होतील. आणखी १० गाड्या ऑक्टोबर २०२१ च्या आधी दाखल होणार आहेत.


हेही वाचा - 

रिलायन्स करणार कर्मचाऱ्यांसह कुटुंबियांचं मोफत लसीकरण

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास ६ महिन्यांची मुदतवाढ

पुढील बातमी
इतर बातम्या