मुंबई-वरळी कोस्टल रोडवर टोल आकारला जाणार नाही

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (7 जानेवारी 2024) रोजी एक अत्यंत मोठी घोषणा केली. (Marine Drive) मरिन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक अशा टप्प्यात असणाऱ्या कोस्टल रोडसाठी टोल भरावा लागणार नाही, हा मार्ग टोलमुक्त असेच असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 31 जानेवारीनंतर या कोस्टल रोडचा पहिला टप्पा प्रवासासाठी सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

मुंबईतील विकासकामं आता थांबणार नसून, (Bandra Versova) वांद्रे- वर्सोवाला विरारशी (Virar) जोडणाऱ्या कोस्टल रोडच्या पुढील टप्प्याच्या बांधकामासही सुरुवात झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

(Mumbai Trans Harbour Link ) शिवडी न्हावा शेवा सागरी सेतूचा उल्लेख करत त्यामुळं मुंबई नवी मुंबई आणि रायगडशी जोडली जाणार असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली. तर दुसरीकडे कोस्टल रोडमुळं विरारसारखी शहरंही या प्रकल्पांमुळं मुख्य झोतात येतील असं आश्वासक वक्तव्यही त्यांनी केलं.

कोस्टल रोड हा मरिन ड्राईव्ह ते वांद्रे वरळी सागरी सेतूला जोडणारा एक 10.58 किमीचा वेगवान कॉरिडोअर मार्ग आहे. यामध्ये रस्ता, भूमिगत बोगद्यानं हा प्रवास करता येणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतातील पहिला समुद्रातून जाणाऱ्या बोगद्याचा समावेश असून, गिरगाव चौपाटीपासून सुरू होणारा हा बोगदा प्रियदर्शनी पार्कपर्यंत जाणार आहे. 

2018 पासून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं बांधकाम हाती घेण्यात आलं. सुरुवातीला या प्रकल्पाचं काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर 2023 पर्यंतचा कालवधी देण्यात आला होता. पण, मासेमारांच्या विरोधामुळं पालिकेनं या प्रकल्पातील एका पुलाच्या आराखड्यामध्ये बदल केल्यामुळं ही तारीख हुकली आणि कोस्टल रोडच्या लोकार्पणाचा कालावधी सहा महिन्यांनी वाढला. 


हेही वाचा

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड सार्वजनिक वाहतुकीसाठी टोलमुक्त करण्याची मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या