परळ स्थानकात मंगळवारपासून ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या परळ स्थानकात मंगळवारी दोन दिवसीय रात्रकालीन ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. नवीन पादचारी पुल बांधण्याचे काम लष्कराने हाती घेतले असून या पुलाच्या कामासाठी हा स्पेशल ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. चिंचपोकळी आणि परळ स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील २ दिवस रात्री हा ब्लॉक असेल.

दोन दिवस असेल ब्लॉक

९ जानेवारी मंगळवारी रात्री १२ वाजल्यापासून ११ जानेवारी गुरुवारी पहाटे ५.३० वाजेपर्यत हा ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक दरम्यान पहाटे ४.१५ ते ५.४० वाजेपर्यंत सीएसएमटीहून सुटणारी डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक भायखळा ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावरुन चालवण्यात येणार आहे.

करीरोड, चिंचपोकळीला लोकल थांबणार नाहीत

ब्लॉक दरम्यान परळ स्थानकात या गाड्यांना दोनदा थांबा देण्यात येणार आहे. तसंच करीरोड आणि चिंचपोकळी स्थानकात जलद लोकल थांबवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे या स्थानकात लोकल थांबणार नाहीत. या स्थानकातील प्रवासी परळ आणि भायखळा स्थानकातून प्रवास करु शकतात, असे मध्य रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या