कांदिवली स्थानकाजवळ रेल्वेची ट्रकला धडक

पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्थानकाजवळ रेल्वे रुळावर ट्रक आल्याने जोराची धडक होऊन अपघात झाला आहे. सोमवारी दुपारी १२:३८ वाजता ही घटना घडली असून या धडकेत ट्रकची मागची बाजू रेल्वे मार्गावर आल्याने ही धडक झाली.

या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. पश्चिम रेल्वेमार्गावर कांदिवली स्टेशनजवळ रेल्वे लाइनवर काम सुरु आहे. यासाठी ट्रकमधून आवश्यक ती मालवाहतूक केली जाते.

ट्रकच्या मागच्या बाजूचं नुकसान झालंय शिवाय रेल्वेच्या धडकेमुळे ट्रक फरफटत गेला, दुभाजकाच्या बॅरिकेटस् तोडून ट्रक पुढे गेला.


हेही वाचा - 

पुढील बातमी
इतर बातम्या