मध्य रेल्वेच्या कर्जत-खोपोलीच्या दोन लोकल फेऱ्या रद्द

कर्जत ते खोपोलीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या  त्रासात बुधवारपासून आणखी भर पडणार आहे. कर्जत यार्डमध्ये बदल करण्यासाठी आवश्यक कामे करण्यासाठी मध्य रेल्वेने कर्जत ते खोपोली घाटमार्गादरम्यान तीन दिवसांचा ब्लॉक घोषित केला आहे. या ब्लॉक कालावधीत दोन लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉक कालावधीत दुपारी १.१५ची कर्जत ते खोपोली आणि २.५५ची खोपोली-कर्जत लोकल रद्द करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून दुपारी १२.२० वाजता सुटणारी खोपोली लोकल कर्जत स्थानकापर्यंत चालवण्यात येईल. कर्जत ते खोपोलीदरम्यान लोकल रद्द राहणार असल्याने खोपोलीहून दुपारी १.४८ला सुटणारी सीएसएमटी लोकल कर्जत स्थानकातून चालवण्यात येईल.


पुढील बातमी
इतर बातम्या