ओला-उबर चालक संपावर, प्रवाशांचे हाल

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • परिवहन

ओला आणि उबर कंपनीच्या ढीसाळ कारभाराला कंटाळून मुंबईसह राज्यभरातील ओला उबर चालकांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. या चालकांनी ओला आणि उबरचा अॅप बंद करून निषेध व्यक्त केला आहे. मुंबईसह राज्यभरातील ओला-उबर चालक-मालकांनी या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे मात्र चांगलेच हाल होणार, यात शंका नाही. 

ओला आणि उबर या कंपनीने सुरुवातीला लाखो रुपयांचं आमिष दाखवल्याने अनेक बेरोजगारांनी कर्ज काढून वाहने खरेदी केली. पण कालांतराने ओला उबर या कंपन्यांनीने स्वत:च्या मालकीची वाहने रस्त्यावर आणली. त्यामुळे उत्पन्नात घट झाल्याने चालकांचे बँकेचे हफ्ते रखडल्याने बँकेने त्यांची वाहने जप्त केली. याशिवाय कंपन्यांनी चालकांच्या वेतनात ३३ टक्क्यांची कपात केली. त्यामुळे कंपनीच्या मनमानीला कंटाळून देशभरातील ६० हजार ओला-उबर चालकांनी हा संप पुकारला आहे.

'नाहीतर संप सुरूच राहिल'

ओला आणि उबरची सेवा सुरू झाल्यानंतर मोठा प्रतिसाद मिळत होता. चालकांना उत्पन्नही चांगला मिळत होता. पण गाड्या वाढल्याने हळूहळू भाडे कमी झाल्याने उत्पन्न घटलं. आता तितकासा प्रतिसाद मिळत नाही. कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे तितकीशी कमाई होत नसल्याने ओला-उबर चालकांनी हा संप पुकारत नाराजी व्यक्त केली आहे. आणि मागण्या मान्य झाल्या नाही तर संप सुरूच राहिल, असा इशाराही या चालकांनी दिला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या