सुरक्षित वाहन चालवल्यास इंधनाची बचत - विनोद तावडे

वाहन चालवताना इंधनाकडे लक्ष ठेवल्यास 20 टक्के इंधनाची बचत होऊ शकते. एका वर्षात वाहनचालक 40 हजार किलोमीटर वाहन चालवतात. वर्षाला 2 हजार लीटरची बचत होईल. त्यामुळे वाहन चालवताना सुरक्षितरित्या चालवा आणि इंधनाची बचत करा असा सल्ला शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिला आहे. वांद्रे (पू.) येथील बीकेसी संकुलनात मंगळवारी आयोजित केलेल्या 'चालक प्रशिक्षण' या कार्यशाळेदरम्यान ते बोलत होते.

वाहन चालकांच्या गुणवंत मुलांना पदवी पर्यंतचे शिक्षण देण्याची जबादारी आपण शिक्षणमंत्री म्हणून घेतो अशी ग्वाही देखील तावडे यांनी दिली. या वेळी भारत पेट्रोलियम व्यवस्थापक डी. राजकुमार, संचालक एस. रमेश, कार्यकारी संचालक जॉर्ज पॉल,

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयचे संचालक अशोक त्रिपाठी आदी मान्यवर उपस्थित होते.

पेट्रोलियम संरक्षण अनुसंसाधान संघाने सक्षम 2017 संरक्षण क्षमता महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम यांच्या वतीने इंधन बचत आणि सुरक्षित वाहनचालक या उद्देशाने इंधन 'संरक्षण जबाबदारी जण गण भागीदारी' रॅली रविवारी काढण्यात आली. शिवडी पूर्व येथील शहीद बापू दुरगुडे पेट्रोल पंपापासून विक्रोळी उड्डाणपुलापर्यंत ही रॅली काढली होती. यात 30 वाहनचालक सहभागी झाले होते. त्यात ज्या वाहनचाकांनी सुरक्षित वाहन चालवून इंधनाची बचत केली आशा दोन वाहनचालकांचा गौरव सदर कार्यक्रमात विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तीन कंपन्यांतील प्रत्येकी 7 कामगारांच्या 21 मुलांना माध्यमिक शालांत परीक्षेत यश मिळवल्याबद्दल प्रति 5 हजारांची मदत देण्यात आली.

दरम्यान 'चालक प्रशिक्षण कार्यशाळा'मध्ये इंधन बचतीसाठी एक लघुपट दाखवण्यात आला. तसेच वाहनचालक आणि क्लिनर यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर देखील आयोजित करण्यात आले होते.

पुढील बातमी
इतर बातम्या