इंटीग्रेटेड स्मार्टकार्डची योजना लांबणीवर

मुंबई - इंटीग्रेटेड स्मार्टकार्ड वापरण्यासाठी मुंबईकरांना आणखीन प्रतिक्षा करावी लागणार आहे. ट्रान्सपोर्ट ऑफ लंडन या सरकारी यंत्रणेची एमएमआरडीएने सल्लागार म्हणून निवड केली होती. पण ती निवड एमएमआरडीएने रद्द केली आहे. ट्रान्सपोर्ट आँफ लंडनकडून व्यवहार्यता अभ्यासासाठी जे शुल्क आकारले जाणार आहे ते शुल्क भरमसाठ आहे. त्यामुळे ही निवड रद्द करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे. सल्लागाराची निवडच रद्द झाल्याने आता तुर्तास तरी ही योजना बारगळली आहे.

दरम्यान या योजनेच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी सल्लागाराची नव्याने नियुक्ती करण्यासाठी लवकरच पुनर्निविदा काढण्यात येतील, अशी माहितीही एमएमआरडीएने दिली आहे. प्रत्यक्ष योजना अंमलात येण्यासाठी बराच काळ जाणार आहे. मोनो, मेट्रो रेल्वे, बस आणि टॅक्सी-रिक्षा अशा सर्वच वाहतुकीसाठी एकच तिकट असा या इंटीग्रेटेड स्मार्टकार्ड योजनेचा उद्देश आहे. पण यासाठी मुंबईकरांना अधिक प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या