लोकलमधून विनातिकीट प्रवास करत असाल, तर मग हे वाचा...

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांंना पश्चिम रेल्वेने चांगलाच दणका दिला आहे. रेल्वेने जानेवारी महिन्यात ७ कोटींचा दंड वसूल केला आहे. तर, विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात १ लाख ९२ गुन्ह्यांती नोंद करण्यात आली आहे. याशिवाय ११४७ भिकारी आणि अनधिकृत फेरीवाले यांना अटक करण्यात आली असून त्यांना देखील आकारण्यात आला आहे. ८५ जणांना तुरुंगात टाकण्यात आलं.

फुकट्यांना दणका

२൦१८ या वर्षी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी फुकट्यांना चाप बसण्यासाठी विशेष लक्ष दिले. सकाळी गर्दीच्या वेळी संधीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून अशा प्रवाशांवर विशेष लक्ष दिलं जात आहे.

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांविरोधात मोहिमच सुरू केली आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात, २൦१८ मध्ये १२ वर्षांवरील ८७ शालेय मुलांना महिला डब्ब्यात प्रवास करताना पकडलं आहे. शिवाय, तिकीट दलालांविरोधातही पश्चिम रेल्वेने कारवाई करत आतापर्यंत २२൦ व्यक्तींवर कारवाई केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या