वीज निर्मितीसाठी रेल्वे रुळाशेजारी मिनी पवनचक्की

पश्चिम रेल्वे (western railway)ने नायगाव (Naigaon) रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला पाच 'विंड टरबाइन' यंञ, म्हणजेच पाच 'मिनी पवनचक्क्या' (Mini Windmills) बसवल्या आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर हे यंञ नायगाव (Naigaon) आणि खार रोड (Khar Road) रेल्वे स्थानकादरम्यानच्या ट्रॅकच्या बाजूला बसवण्यात आले आहे. रेल्वे ट्रॅकवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल ट्रेनपासून तयार होणाऱ्या वाऱ्यावर हे यंञ सुरू राहणार आहे आणि त्याद्वारे वीज निर्मिती होणार आहे.  

लोकल ट्रेन ही साधारण 50 ते 100 किमी प्रति तास वेगाने धावत असते, त्यामुळे या धावत्या लोकलमुळे वाऱ्याची निर्मिती होते आणि निर्माण होणाऱ्या वाऱ्याच्या झोतामुळे 'विंड टरबाइन'चे ब्लेड फिरले जातात आणि याद्वारे या यंत्रातून वीज तयार केली जाते. या मिनी पवनचक्कीची क्षमता 400 वॅट्स इतकी आहे, या दरम्यान 2 किलोवॉट सौरऊर्जेचं आऊटपुट या यंत्रातून मिळतं, त्यामुळे रेल्वे स्थानकातील वीज उपकरणास त्याचा उपयोग होतो.

पश्चिम रेल्वे या पवन ऊर्जा प्रकल्पामुळे पर्यावरणासंबधी मोठं काम करत आहे. हे यंत्र यशस्वी झाल्यास सर्व रेल्वे स्थानकांच्या रेल्वे रूळाशेजारी असे 'विंड टरबाइन' लावण्याचा मानस पश्चिम रेल्वेचा आहे.

पश्चिम रेल्वेने या अगोदर 97 रेल्वे स्थानकांवर, तर 46 हून अधिक रेल्वे कार्यालयाच्या इमारतींवर सौर ऊर्जेचे उपकरण लावले आहे. आता 'विंड टरबाइन' हे सगळ्या रेल्वे स्थानकांवर व्यापक प्रमाणात लावून, याचा उपयोग वीज निर्मितीसाठी करण्यात येणार आहे.

आजच्या घडीला सर्वात जास्त विजेचा वापर हा रेल्वे आणि रेल्वे प्लॅटफॉर्मवर केला जात आहे. या यंत्रामुळे रेल्वे स्थानकात आवश्यक असलेल्या विजेचा भार कमी होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रवाशांनी या यंत्रणेचे स्वागत केले असून, वीज निर्मितीसाठी सर्व रेल्वे स्थानकांत अशी यंत्रणा बसवावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या यंत्रणेने वीजनिर्मिती होणार आहे, रेल्वे स्थानकात लावण्यात आलेल्या वीज उपकरणांवर विजेचा भार कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जाणार आहे.


हेही वाचा

बेस्टच्या आणखी 4 एसी डबल-डेकर ई-बसेस सेवेत दाखल होणार

वंदे भारत मेट्रो लोकल ट्रेन लवकरच मुंबईत धावणार

पुढील बातमी
इतर बातम्या