पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून वसूल केला १० कोटींचा दंड

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • परिवहन

पश्चिम रेल्वेने फुकट्या प्रवाशांकडून फेब्रुवारी महिन्यात १० कोटींचा दंड वसूल केला आहे. फुकट्या प्रवाशांविरुद्ध फेब्रुवारी महिन्यामध्ये केलेल्या कारवाईत पश्चिम रेल्वेने ८९ हजार गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यामधून पश्चिम रेल्वेने १० कोटी ९५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

उपनगरीय रेल्वेवर दिवसेंदिवस फुकट्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातच स्वत: चं आरक्षित तिकीट दुसऱ्याला देणं, विना तिकीट प्रवास करणं, अशा घटनांची संख्याही वाढतच आहे.

पश्चिम रेल्वे प्रशासनाने एप्रिल २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत तिकीट दलाला आणि इतर संशयित व्यक्तींविरुद्ध कारवाई केली.

त्यामध्ये २३ लाख गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यामधून ९९ कोटी ३३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान, यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ९.३६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

तसंच, पश्चिम रेल्वे प्रशासनातर्फे विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मोहीम सुरूच ठेवली आहे. त्यामुळे, प्रवाशांनी विना तिकीट प्रवास करू नये, असं आवाहन पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या