आता मोबाईलवर मिळणार रेल्वे सुरक्षेचे धडे

मुंबई - मुबंईची लाइफलाइन समजली जाणाऱ्या रेल्वे मार्गावर दिवसेंदिवस अपघात वाढत असल्याचे समोर येत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून अनेक उपायोजना राबवल्या जातात. तरी देखील अपघातांच्या संख्येत घट होत नाहीये. रेल्वेमध्ये प्रत्येक वेळी अपघात टाळण्यासाठी सूचना केल्या जातात. तरीही अपघातांच्या संख्येत घट होत नसल्याने पश्‍चिम रेल्वे प्रशासनाने रेल्वेमध्ये सूचना देण्यासोबतच आता थेट प्रवाशांच्या मोबाईलवर संदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे.

रेल्वे अपघात रोखण्यासाठी संरक्षक भिंतीसह, पादचारी पुलांची उभारणी, प्रवासी जनजागृती मोहीम, रेल्वे फाटक बंद करणे यासारख्या अनेक योजना रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. मात्र, पादचारी पूल असतानाही रेल्वे रुळ ओलांडणे, एका फलाटावरून दुसर्‍या फलाटावर बिनधास्त उड्या मारून जाणे, असे प्रकार होण्याचे प्रमाण वाढले आहे. रेल्वेरुळ ओलांडू नका, पादचारी पूल आणि सबवेचा वापर करा अशा प्रकारचे आवाहन पश्‍चिम रेल्वेकडून थेट मोबाईलवर संदेश पाठवून करण्यात आले आहे.

“रेल्वेकडून ही उपाययोजना राबवण्यात येत आहे याचे आम्ही स्वागत करतो. कारण दिवसेंदिवस अपघात संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाने अपघात टाळण्यासाठी अशा नवनवीन उपाययोजना आणाव्यात. संदेश पाठवण्याची योजना पश्चिम रेल्वे सोबतच मध्य रेल्वेतही आणावी. कारण पश्चिम रेल्वेपेक्षा मध्य रेल्वे मार्गावर अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. 

- नयना भोईर, उपाध्यक्षा, रेल्वे महिला प्रवासी संघटना

पुढील बातमी
इतर बातम्या