पश्‍चिम रेल्वेचं दिवसाला 'इतकं' उत्पन्न

सध्या पश्‍चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांची संख्या ९ लाखांवर पोहोचली आहे. पश्‍चिम रेल्वेवर सोमवार १८ जानेवारी रोजी तिकीट आणि पासधारक मिळून ९ लाख २ हजार ९४९ जणांनी प्रवास केला. यातून पश्‍चिम रेल्वेला दिवसाला १ कोटी ९५ लाखांचं उत्पन्न मिळालं आहे. पश्‍चिम रेल्वे मार्गावरून दररोज सुमारे १ हजार २०१ फेऱ्या होत आहेत. यातून उपनगरी रेल्वेगाड्यांमधून सामान्यांना प्रवासास मज्जाव करण्यात आला आहे. मात्र, राज्य सरकारनं अनुमती दिलेल्या क्षेत्रातील प्रवाशांना आणि महिलांना प्रवास करता येत आहे.

१ जानेवारीला तिकीट आणि पासधारक मिळून ७ लाख ५७ हजार ८७९ जणांनी प्रवास केला. यातील तिकीटधारकांची संख्या १ लाख ४४ हजार ६०७ इतकी आहे. तिकीट व पासधारक यांच्याकडून ६९ लाख ८७ हजार रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. तसंच, १८ जानेवारीला ९ लाख २ हजार ९४९ जणांनी प्रवास केला. यात तिकीटधारकांची संख्या १ लाख ७७ हजार ९०५ आहे. तिकीट व पासधारक यांच्याकडून १ कोटी ९५ हजारांचं उत्पन्न मिळालं आहे.

पश्‍चिम रेल्वेवर डिसेंबर २०२० मध्ये सरासरी ७ लाख जण प्रवास करीत होते. सोमवार १८ जानेवारीपासून रोज सुमारे ९ लाख प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामुळं राज्य सरकारनं अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी, वकील, परीक्षार्थी, महिलांना ठराविक वेळेत प्रवास करण्याची मुभा देण्यात आल्याचं पश्‍चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

प्रवासी संख्या 

  • १ जानेवारी - ७,५७,८७९. 
  • ६ जानेवारी - ८,२५.०००. 
  • १२ जानेवारी - ८,४१,८११.
  • १४ जानेवारी - ८,५२,७८९.
  • १८ जानेवारी - ९,०२,९४९. 
पुढील बातमी
इतर बातम्या