एसी लोकलच्या आणखी ८ फेऱ्या पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी व गारेगार प्रवासाची संधी मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनानं एसी लोकल सुरू केल्या आहेत. अशातच आणखी ८ सेवा सोमवार २२ नोव्हेंबरपासून पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार असल्याची माहिती समोर येत आहे.  त्यामुळं एसी लोकलची गाड्यांची एकूण संख्या २० होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात एसी गाड्या सुरू केल्या जात आहेत. या ८ नवीन सेवांपैकी २ पीक अवर्समध्ये धावतील आणि प्रत्येकी चार अप व डाऊन मार्गावर धावतील.

अप मार्गावर धावणारी एसी लोकल विरार आणि चर्चगेट स्थानकादरम्यान, २ बोरिवली आणि चर्चगेट दरम्यान आणि एक गोरेगाव आणि चर्चगेट दरम्यान धावेल. तसंच, डाऊन मार्गावर एक ट्रेन चर्चगेट आणि नालासोपारा दरम्यान, २ चर्चगेट आणि बोरिवली दरम्यान आणि एक चर्चगेट आणि गोरेगाव दरम्यान धावेल.

सध्यस्थितीत मध्य रेल्वे मार्गावर एकूण २६ लोकल धावत आहेत, त्यापैकी १६ ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-पनवेल दरम्यान  चालवल्या जात आहेत. उर्वरित गाड्या मुख्य मार्गावर धावत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या