एसटी कामगार अद्याप २ महिन्यांच्या वेतनाच्या प्रतीक्षेत

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवलं आहे. एसटी महामंडळाकडून (Msrtc) कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले. परंतु ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे वेतन अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळं हे वेतन मिळणार कधी? असा सवाल एसटी कामगार संघटनांनी उपस्थित केला आहे.

कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते द्यावे, त्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार संघटनेने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडं केली आहे. यासंदर्भात गुरुवारी राज्यपालांना निवेदनही देण्यात आले.

पुढील २ महिन्याचे वेतन तात्काळ मिळावे, त्यासाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी आदेश देण्याबाबत राज्यपालांकडे चर्चा करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र एस.टी.कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.


हेही वाचा - 

आता खासगी बसमधूनही १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

रेल्वेत प्रवास करण्याची परवानगी मिळाली, पण डबेवाले क्यूआर कोडमुळे त्रस्त


पुढील बातमी
इतर बातम्या