एसी लोकलच्या चाचण्या आता 'परे' वर

गेले अनेक महिने चर्चेत असलेल्या एसी लोकलच्या चाचण्या मध्य रेल्वे मार्गावर पूर्ण झाल्या असून, गुरुवारी रात्री एसी लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल झाली आहे. एसी लोकलच्या चाचण्या करण्यासाठी मध्य रेल्वे मार्गावर तीन ते चार महिने लागले असून, पश्चिम रेल्वेवर देखील तेवढाच कालावधी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना गारेगार प्रवास आता पावसाळ्यानंतर अनुभवता येणार आहे.

वर्षभरापूर्वी मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेडमध्ये ही एसी लोकल चाचणीसाठी आणण्यात आली होती. चाचण्या सुरू असतानाच ही लोकल चालविण्यास मध्य रेल्वेने नकार दिल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावर मंजुरी देण्यात आली आहे. चर्चगेट ते बोरीवली आणि चर्चगेट ते अंधेरी दरम्यान अशा लोकल चालवण्यात येणार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या