Advertisement

मेट्रो प्रवाशांना 'या' दिवशी तिकिटावर मोठी सवलत

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर MMRDAचा निर्णय.

मेट्रो प्रवाशांना 'या' दिवशी तिकिटावर मोठी सवलत
SHARES

महाराष्ट्रात 5 टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक होतेय. पाचव्या टप्प्यात मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रांसाठी 20 मे रोजी मतदान होईल. या दिवशी मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना तिकिटावर 10% सवलत मिळणार आहे. 

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने घेतला आहे. ही सवलत मुंबई मेट्रो 1 कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, पेपर तिकीट अशा सर्व माध्यमातून देण्यात येणार आहे. 

मुंबई मेट्रो मार्ग 2अ आणि 7 च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 90 कोटी नागरिकांनी प्रवास केला असल्याने मुंबई मेट्रोचा उपयुक्तता अधोरेखित झाली आहे. 

सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत नागरिकांना मेट्रोच्या माध्यमातून आरामदायक प्रवास करत, मतदानाचा आपला हक्क बजावता यावा यासाठी महामुंबई मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

लोकसभा निवडणुक 2024 मध्ये मतदान करण्यासाठी मेट्रो प्रवाशांना प्रोत्साहित करून त्यांच्या मतदानाच्या कर्तुत्वाबाबत जाणीव करून देण्यासाठी, महामुंबई मेट्रो मतदार जागरूकता आणि सहभाग (SVEEP) या उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा