Advertisement

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक

'या' गाड्यांवर होणार परिणाम

पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्य रात्री विशेष ब्लॉक
SHARES

चर्चगेट परिसरातील वानखेडे स्टेडिअमला जोडणारा पादचारी पूल जुना झाल्याने तो पाडण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

पुलाच्या पाडकामासाठी शनिवारी मध्यरात्री 1.10 ते रविवारी पहाटे 4.10 दरम्यान विशेष ट्रॅफिक ब्लॉक रेल्वे प्रशासनाने घोषित केला आहे. यामुळे रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्यांमध्ये काही बदल होणार असून काही लोकल फेऱ्या अंशत: रद्द करण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री 11.30 ची विरारहून सूटणारी चर्चगेट लोकल रात्री 1.10 वाजता चर्चगेटला पोहोचणार आहे. ही चर्चगेटला येणारी शेवटची लोकल असेल. यानंतर ब्लॉक घेऊन पाडकामाची कामे सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई सेंट्रलपर्यंत धावणाऱ्या लोकल फेऱ्या

  • शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.10ची बोरिवली-चर्चगेट
  • शनिवारी मध्यरात्रीनंतर 11.49ची विरार-चर्चगेट
  • शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.30ची बोरिवली-चर्चगेट
  • शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.05ची विरार-चर्चगेट

मुंबई सेंट्रलहून सुटणाऱ्या लोकल फेऱ्या (चर्चगेट-मुंबई सेंट्रल रद्द)

  • रविवारी पहाटे 4.25 ची मुंबई सेंट्रल-विरार
  • रविवारी पहाटे 4.18ची मुंबई सेंट्रल-बोरिवली



हेही वाचा

सीएसएमटी : दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक, 'या' एक्सप्रेस रद्द

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा