Advertisement

मुंबईत खासगी विमान कोसळले, विमानतळावरील वाहतूक बंद

खराब हवामानामुळं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबईत खासगी विमान कोसळले, विमानतळावरील वाहतूक बंद
SHARES

मुंबई विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. एक खाजगी विमान मुंबई विमानतळावर क्रॅश झाले आहे. 8 प्रवासी या अपघात ग्रस्त प्रायव्हेटमधून प्रवास करत होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई विमानतळावर बचाव कार्य सुरू आहे.

मुंबई विमानतळावरच लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला असल्याचे समजते. खराब हवामानामुळं विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, विमान अपघात होताच विमानतळावरील सर्व वाहतूक बंद करण्यात आली. मुंबई विमानतळावरुन विमानांचे टेक ऑफ आणि लँडिंग थांबवण्यात आले. 

VSR Ventures Learjet 45 हे विमान अपघातग्रस्त झाले आहे.  VT-DBL ऑपरेटिंग फ्लाइट विशाखापट्टणम ते मुंबई असे उड्डाण करत होते. हे विमान मुंबई विमानतळावर धावपट्टी क्रमांक 27 वर उतरत असताना हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले.

लँडिंगच्या वेळी धावपट्टीवर हे विमान कोसळले. विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स एकूण 8 जण प्रवास करत होते. विमान लँडिंग करत असताना अतिवृष्टीसह दृश्यता 700 मीटर होती. यामुळे खराब हवामानामुळेच विमान कोसळ्याची माहिती समोर येते.  आत्तापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती डीजीसीए कडून देण्यात आलेय. 



हेही वाचा

मुंबईच्या वेशीवरील ५ नाक्यावरचा टोल वाढला

ब्रेडच्या किमतीत वाढ, जाणून घ्या नवे दर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा