मुंबईच्या वेशीवरील टोलनाक्यांवरील टोलवाढीच्या मुद्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण मुंबईत प्रवेश करण्याआधी लागणाऱ्या 5 टोलनाक्यावरील टोल वाढवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एक खाजगी एजन्सी - सवलतधारक नियुक्त केले आहेत. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव म्हणाले की नियुक्त केलेले सवलतधारक 2026 पर्यंत टोल वसूल करतील. पाच प्रवेश बिंदूंवरील टोल वसुली 2026 पर्यंत वैध आहे.
हेही वाचा