कार, दुकानं फोडणारी टोळी जेरबंद


कार, दुकानं फोडणारी टोळी जेरबंद
SHARES

महागड्या कारमधील वस्तू अाणि किराना दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला मुंबईतील वनराई पोलिसांनी अटक केली अाहे. पोलिसांनी अारोपींकडून २१ लाख ७८ हजार रुपयांचा चोरीचा माल हस्तगत केला अाहे. यामध्ये १४ एलईडी टीव्ही, जीम प्रोटीन पावडर, अॅल्युमिनिअम प्लेट, मेकअपचं सामान, डीजे साऊंड, किराना सामान अाणि काॅपर वायर अादी वस्तूंचा समावेश अाहे.


काय अाहे प्रकरण ?

झोन १२ चे पोलिस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितलं की, या टोळीने १५ जुलै २०१८ ला गोरेगाव पूर्व येथील एका हार्डवेअरच्या दुकानाचे कुलूप तोडून ६.६० लाख रुपयाची काॅपर वायर अाणि अॅल्युमिनिअम प्लेट चोरली होती. त्याचबरोबर या टोळीने अन्य ठिकाणीही चोरी केल्याचं उघड झालं अाहे. पोलिस याप्रकरणी त्यांचा शोध घेत होते. ही टोळी दहिसर चेक नाका येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी सापळा लावून २६ जुलैला एका मारुती सुझुकी कारसह ४ जणांना ताब्यात घेतले.  राजेश कदम (३२, चारकोप),  राकेश यादव (३३, नालासोपारा),  ध्रुव रामप्रताप गुप्ता (२८, नालासोपारा) अाणि अब्दुल शेख (३३, मस्जिद बंद ) अशी अारोपींची नावे अाहेत.


मोठी दुकाने फोडली

अारोपींच्या चौकशीतून त्यांनी मुंबईमध्ये अाणि नालासोपारा, विरार, वालीव पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरी केल्याचं उघड झालं अाहे. या टोळीनं अातापर्यंत ६ पेक्षा अधिक मोठी दुकाने फोडून लाखो रुपयांचं सामान चोरलं अाहे.



हेही वाचा - 

एएनसीकडून ९ नायझेरियन तस्करांना अटक

सोने तस्करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा