सोने तस्करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक


सोने तस्करीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला अटक
SHARES

डीआरआय ( गुप्तवार्ता संचलनालय)नं सोने तस्तरीच्या गुन्ह्यात मुंबईतील काँग्रेसच्या एकाधिकाऱ्याला अटक केली आहे. मोहम्मद जामदार असं या आरोपीचं नाव आहे. वांद्रे वरळी सी लिंक ते सीएसएमटी दरम्यान पाठलाग करून जामदारला अटक केली आहे. या सोने तस्करीसाठी गरीब लोकांचा वापर केल्याचं तपासात पुढे आलं आहे.


दुबईतून सोनेतस्करी

दक्षिण मुंबईत राहणारा मोहम्मद हा काँग्रेसचा जिल्हा सचिव आहॆ. पक्षात वजन असलेल्या मोहम्मदनं अापल्या पदाचा पूर्णपणे वापर करत २०१५ पासूनच परिसरातील गरीब लोकांना हाताशी धरून दुबईतून सोने तस्करी सुरू केली. या तस्करीतून तो गरीबांना मोबदला द्यायचा. कुणाला हज यात्रेसाठी पाठवून तर कुणाला नोकरीसाठी पाठवायचा. दुबईत गेल्यानंतर त्यांच्या माणसांना भेटायला सांगून ते या गरीब प्रवाशांकडे सोने पाठवून द्यायचे. फेब्रुवारीत डीआरआयने या तस्करीप्रकरणी एका महिलेला अटक केल्यानंतर तिच्या चैाकशीतून मोहम्मदचे नाव पुढे आले.


कारमधून पळ काढला

शुक्रवारी मोहम्मदला पकडण्यासाठी डीआरआयच्या अधिकाऱ्यांचं पथक गेलं. त्यावेळी कारमध्ये बसून मोहम्मदने पळ काढला. त्यानुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग सुरू केला. वांद्रे वरळी सी लिंक येथून डीआरआयचे अधिकारी त्याच्या गाडीचा पाठलाग करत होते. सीएसएमटी येथे वाहतूक कोंडीत मोहम्मदची गाडी अडकल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. तब्बल ४५ मिनिटे हा चोर-पोलिसाचा खेळ सुरू होता.


हेही वाचा -

विकृत तरूणाचे पनवेल-अंधेरी लोकलमध्ये अश्लील चाळे!

कस्टम ड्युटी चुकवून सोने तस्करी; २१ लाखांची ५८ बिस्किटं हस्तगत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा