SHARE

मुंबईतील महिला लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. काही महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात उभ्या असलेल्या एक्स्प्रेसमधील विकृत प्रवाशाने गाडीतील तरुणीला पाहत हस्तमैथुन केल्याची घटना घडली होती. तशीच एक घटना पनवेल अंधेरी मार्गावरील लोकल ट्रेनमध्ये घडल्याचं उघडकीस आलं आहे.


कधी घडली घटना?

ही घटना रविवार २२ जुलै रोजीची आहे. तक्रारदार तरूणीने रविवारी ट्रेकींगवरून घरी परतण्यासाठी ७.३५ वाजता पनवेलहून अंधेरीला जाणारी लोकल पकडली. रविवारी या मार्गावरील लोकलमध्ये गर्दी कमीच असते. ज्या महिला डब्यात तक्रारदार तरूणी बसली होती, त्या डब्यात इतर कुणीच प्रवासी नव्हतं.


अचानक चढला डब्यात

लोकल सुरू झाल्यावर एक तरूण धावत येऊन त्याच डब्यात चढला आणि काही वेळाने तरूणीसमोर पँन्टची चेन काढून हस्तमैथुन करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून तरुणी घाबरली आणि तिने आरडाओरडा सुरु केली.


मोबाइलही हिसकावून घेतला

सोबतच तिने आपल्या मोबाइलमध्ये विकृत तरूणााचा फोटो काढण्याचाही प्रयत्न केला. पण, तेवढ्यात त्याने तरुणीच्या हातून मोबाइल हिसकावून घेतला. इतक्यात खांडेश्वर स्थानक आल्यावर तरूणीने स्थानकावरील इतर प्रवाशांना मदतीसाठी आवाज दिला. मात्र हा तरूण तोपर्यंत गाडीतून उडी मारून पळून गेला.

याप्रकरणी पनवेल पोलिसांनी २३ जुलै रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्या तरूणाचा सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध सुरू असल्याची माहिती पनवेल पोलिसांनी दिली.हेही वाचा-

वाशीच्या खाडीत मुलाची अात्महत्या

दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटकसंबंधित विषय
ताज्या बातम्या