दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक

एलटी मार्ग परिसरात असलेल्या दुकानात दरोडा टाकून पळालेल्या दोन सराईत गुंडाना शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. नदीम शकिर खान, मोहम्मद नफी नूर मोहम्मद शेख, अशी या दोन आरोपींची नावं आहेत. या दोघांना न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दुकानांवर दरोडा टाकणाऱ्या सराईत आरोपींना अटक
SHARES

दक्षिण मुंबईतल्या पायधुनी येथील एलटी मार्ग परिसरातल्या एका दुकानात दरोडा टाकून पळालेल्या दोन सराईत गुंडाना शिवडी पोलिसांनी अटक केली आहे. नदीम शकिर खान, मोहम्मद नफी नूर मोहम्मद शेख, अशी या दोन आरोपींची नावं आहेत. या दोघांना न्यायालयाने 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


चोरीचा संपूर्ण प्रकार

सध्या पोलिसांच्या तावडीत असलेल्या आरोपींनी रविवारी एलटी मार्ग परिसरातील अब्दुल रहमान स्ट्रिट येथील एका दुकानावर दरोडा टाकला. त्यावेळी दुकानातील तिजोरी उघडता येत नसल्यामुळे ते दोघे चक्क तिजोरी घेऊन पळाले. त्यानंतर हे दोघेही शिवडी परिसरात येऊन एका निर्जनस्थळी तिजोरी तोडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तिजोरी काही केल्या तुटत नव्हती. 

हे दोघेही तिजोरी तोडण्यात व्यस्त असताना शिवडी पोलिसांची गस्तीवर असलेली गाडी त्यांच्याजवळ केव्हा आली हे त्यांना कळलंच नाही. गाडीला पाहून दोघांनी तिजोरी लपवली. दरम्यान या दोघांवरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्याकडे विचारपूस केली. मात्र हे दोघेही पोलिसांना असमाधानकारक उत्तरं देत नव्हते. त्याचवेळी पोलिसांची नजर त्या तिजोरीवर पडली. पोलिस त्यांना पकडणार तोच त्या दोघांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी दोघांना काही अंतरावर गाठले.


चौकशीत चोरीची दिली कबुली

पोलिसांनी दोघांकडे कसून चौकशी केली असता. दोघांनी एलटी मार्ग परिसरात एका दुकानावर दरोडा टाकल्याची कबुली दिली. दरम्यान चोरीची तिजोरी उघडली असता त्यात 8 लाख 9 हजार रुपये होते. या चोरीची माहिती पोलिसांनी एलटी मार्ग पोलिसांना देत, ज्या दुकानात या दोघांनी चोरी केली त्याला दुकानदाराला चौकशीसाठी बोलवून त्यांना चोरीचं सामान सुपूर्द केलं. न्यायालयाने या दोघांना 27 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या दोघांचा ताबा लवकरच शिवडी पोलिस एलटी मार्ग पोलिसांना देणार आहे.


हेही वाचा - 

वनराई पोलिसांची कमाल, दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना अटक

भांडुपमध्ये कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा