वनराई पोलिसांची कमाल, दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना अटक


वनराई पोलिसांची कमाल, दरोडा टाकण्यापूर्वीच तिघांना अटक
SHARES

वनराई पोलिसांनी सापळा रचून एका मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये दरोडा टाकण्यापूर्वीच तीन जणांना अटक केली आहे. पोलिसांनी विकास साहू (२९) आणि उत्कर्ष श्रीवास्तव (२२) या दोघांना मंगळवारी तर तिसऱ्या आरोपीला आधीच अटक केली होती.

विकास साहू हा मिरारोड इथं राहणारा असून तो पेशाने रिक्षा चालक आहे. तर उत्कर्ष श्रीवास्तव हा कानपूर इथं राहणारा असून तो दीड महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर त्याची विकाससोबत ओळख झाली. त्यानंतर या दोघांनी हत्यारं विकण्याचा धंदा सुरू केला.


'अशी' झाली अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी गोरेगाव येथील एका वाइन शॉपमध्ये चोरी करून मालकाची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना वनराई पोलिसांना काही जण उत्तर प्रदेशातून हत्यार घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस उपायुक्त विनय राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योत्स्ना रासम यांच्या नेतृत्वाखील पथकाने सापळा रचून मंगळवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास राम मंदीर रेल्वे स्थानकाबाहेर या दोघांना अटक केली.


काय सापडलं?

या दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी २ देशी पिस्तुल, ४ मॅगजीन आणि २० काडतूस जप्त केले आहेत. तसंच या आरोपींवर भादंवि च्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयात दाखल करण्यात आल्यावर न्यायालयानं या दोघांनाही २० जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.



हेही वाचा-

भारतात रॅन्समवेअर्सचे हल्ले २० टक्क्यांनी वाढले!

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा