लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल

१० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)च्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बिपीन बाळकृष्ण चव्हाण असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल
SHARES

मुंबईतील दिंडोशी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने कारवाई न करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)च्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. बिपीन बाळकृष्ण चव्हाण असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. अशा लाचखोर पोलिस कर्मचाऱ्यांमुळेच राज्यातील भ्रष्टाचारांच्या यादीत गृहखाते दुसऱ्या क्रमांकावर आहे.


१० हजारांची मागितली लाच

दिंडोशी परिसरात राहणाऱ्या कपडे व्यापाऱ्यानं ऑर्डरचे पैसे परत न केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता. हा गुन्हा कालांतराने तपासासाठी बिपीन यांच्याकडे सोपवण्यात आला. त्यावेळी बिपीन यांनी तक्रारदारास चौकशीला बोलवून हे प्रकरण मिटवण्यासाठी १० हजारांची मागणी केली. मात्र कारण नसताना पोलीस कर्मचारी लाचेसाठी दबाव टाकत असल्यानं तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली.

या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर आणि साक्षीदारांकडून बिपीन चव्हाणविरोधात मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे एसीबीने सोमवारी चव्हाणवर गुन्हा नोंदवला. याप्रकरणाची सखोल चौकशी एसीबीचे अधिकारी करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा