
भांडुप पंपिंग स्टेशनजवळील पिअर P78 परिसरात हा पहिला स्पॅन बसवण्यात आला. 90 टनांहून अधिक वजनाचा हा सेगमेंट 115 मीटर लांबीच्या मेकॅनाइज्ड लॉन्चिंग गॅन्ट्रीच्या मदतीने उभारण्यात आला. विशेष म्हणजे, या कामासाठी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक बंद करण्यात आली नाही.
हा संपूर्ण कॉरिडॉर 13.9 किलोमीटर लांबीचा आणि सहा पदरी असेल. चेड्डानगर ते आनंदनगरदरम्यानचा हा मार्ग घाटकोपर, विक्रोळी, कांजूरमार्ग, JVLR, ऐरोली आणि मुलुंड या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे.
मुंबई-ठाणेदरम्यान वाहतुकीसाठी हा अतिरिक्त क्षमतेचा मार्ग उपलब्ध झाल्याने ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची अपेक्षा आहे.
या उन्नत मार्गावर एकूण 288 स्पॅन उभारले जाणार आहेत. प्रत्येक स्पॅनची लांबी साधारण 40 मीटर असून, त्यासाठी 16 प्रीकास्ट सेगमेंटचा वापर केला जाणार आहे. पूर्ण झालेल्या पहिल्या स्पॅनचे एकूण वजन सुमारे 1,450 टन आहे.
प्रकल्पाच्या ताज्या आकडेवारीनुसार,
81% मोनोपाइलचे काम पूर्ण
19% ग्रुप-पाइलचे काम पूर्ण
51% पिअरचे काम पूर्ण
33% पिअर-कॅपचे काम पूर्ण
एकूण 3,732 प्रीकास्ट सेगमेंट तयार करायचे असून आतापर्यंत 135 सेगमेंटचे कास्टिंग पूर्ण
या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य MMRDAने ठेवले आहे.
प्रकल्प पूर्ण होऊन वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मुंबई ते ठाणे प्रवासाचा वेळ सुमारे 20 ते 25 मिनिटांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. तसेच मुंबई आणि ठाणे दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुधारण्यासोबतच ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास या मार्गाची मदत होऊ शकते.
हेही वाचा
