भांडुपमध्ये कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या

भांडुपमध्ये एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. सुशीलकुमार वर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे.

भांडुपमध्ये कॉलेजमध्ये घुसून विद्यार्थ्याची हत्या
SHARES

भांडुपच्या श्रीमती राम कली सन्मान सिंग महाविद्यालयात शिकणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी १२.१५ च्या सुमारास घडली. सुशीलकुमार वर्मा असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा सुरू आहे.


संपूर्ण प्रकार

भांडुप परिसरात राहणारा सुशील कुमार हा श्रीमती राम कली सन्मान सिंग महाविद्यालयात १२ वी सायन्स कक्षेत शिकत होता. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास सुशील त्याच्या वर्गात असताना अचानक एक मुलगा तोंडाला रुमाल बांधून आला. त्याने सुशीलला चर्चा करण्यासाठी वर्गाबाहेर बोलावलं. त्यावेळी सुशील त्याच्यासोबत वर्गाबाहेर गेला. दरम्यान महाविद्यालयातील एका कोपऱ्यात नेत त्याची चाकूने भोसकून हत्या केली आणि तेथून पळ काढला.

अर्धा तास उलटल्यानंतरही सुशील वर्गात न आल्याने त्याचे मित्र त्याला बोलवण्यासाठी वर्गाबाहेर गेले असता वर्गाजवळील एका कोपऱ्यात सुशील रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. याची माहिती सुशीलच्या मित्राने शिक्षकांना दिल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने सुशीलला तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी तपासून सुशीलला मृत घोषीत केलं.


पोलिसांची चौकशी सुरू

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होत सुशीलला कुणी मारलं, त्याचं कुणासोबत भांडण होते का?, सुशीलला वर्गाबाहेर घेऊन जाणाऱ्यास कुणी ओळखतं का? या अनुशंगाने त्याच्या मित्रांकडे चौकशी करत आहेत. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी महाविद्यालयातील सीसीटीव्हीही तपासून पहात आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा