Advertisement

येत्या काही वर्षात मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा

पालिकेकडून संभाव्य हवामान बदलाचे धोके लक्षात घेऊन मुंबईच्या 149 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचे आरेखन केले जाणार आहे.

येत्या काही वर्षात मुंबई पाण्याखाली जाण्याचा इशारा
SHARES

समुद्राच्या पातळीत वाढ होऊन या शतकाच्या अखेरीस मुंबई (mumbai) शहराचा काही भाग कायमस्वरूपी पाण्याखाली (underwater) जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यासंदर्भात समुद्राच्या पाण्यात वाढ झाल्यास मुंबईतील कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे. तसेच एकदंरीतच याचा शहरावर काय परिणाम होईल, याचा अभ्यास करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून (brihanmumbai municipal corporation) नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे.

याआधी देखील पालिकेने अशाप्रकारचे मूल्यांकन केले होते. मागील पाच वर्षातील हे दुसरे मुल्याकंन आहे.

नुकताच संयुक्त राष्ट्रसंघाच्या (united nations)  एका अहवालात समुद्राच्या वाढत्या पाण्याच्या पातळीचा (rising sealevel) मुंबई शहराला धोका असल्याने नमूद करण्यात आले आहे.

यासाठी पालिकेकडून संभाव्य हवामान बदलाचे धोके लक्षात घेऊन मुंबईच्या 149 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीवरील संवेदनशील भागांचे आरेखन केले जाणार आहे.

तसेच कोणत्या भागांना सर्वाधिक धोका आहे, जमिनीच्या वापरात झालेले बदल, किनारी प्रदेशात होणारा विकास आणि बदलत्या हवामानामुळे शहराला असणाऱ्या धोक्यांमध्ये झालेले बदल अशा सर्व मुद्द्यांचा यात परीक्षण केले जाणार आहे.

मागील पाच वर्षात मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) उभा राहिला असून यासाठी समुद्रात 100 हेक्टरहून अधिक क्षेत्रात भरणी घालण्यात आली.

तसेच शहराच्या पूर्व किनारपट्टीभागात मिठागरांच्या जागांवर नव्याने विकास प्रकल्प होऊ घातले आहेत.

तसेच एकंदरीतच मुंबईत उपलब्ध असणाऱ्या जमिनींचा वापर करण्याची पद्धतीही बदलीली आहे, त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेऊन मूल्यांकन करणे गरजेचे आहे, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा 

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पहिली 10 हजार घरं कधी तयार होणार?

अवैध जात प्रमाणपत्रावरून ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊत अपात्र

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा