Advertisement

गणेशोत्सवात मुंबई मेट्रो-3 मध्यरात्रीपर्यंत धावणार

सध्या या स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता सुटते.

गणेशोत्सवात मुंबई मेट्रो-3 मध्यरात्रीपर्यंत धावणार
SHARES

गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि गणेशभक्तांचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) मेट्रो-3 अर्थात Aqua Lineच्या वेळेत मोठा बदल केला आहे.

14 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर 2026 या कालावधीत मेट्रो-3ची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.

कफ परेड आणि आरे JVLR या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून सुटणारी शेवटची मेट्रो आता रात्री 12 वाजता सुटणार आहे. सध्या या स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10.30 वाजता सुटते. म्हणजेच गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना अतिरिक्त 90 मिनिटांचा प्रवासाचा वेळ मिळणार आहे.

मेट्रो-3च्या माध्यमातून सिद्धिविनायक, दादर, वरळी, महालक्ष्मी आणि गिरगाव परिसरातील अनेक प्रसिद्ध गणेश मंडळांपर्यंत पोहोचणं सोयीचं होणार आहे. त्यामुळे गणेश मंडपांना भेट देण्यासाठी रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा त्रास टाळून भाविकांना मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

गणेशमूर्ती घेऊन मेट्रोने प्रवास करणाऱ्या भाविकांसाठीही MMRCने विशेष परवानगी दिली आहे. 18 इंच म्हणजेच 45 सेंटीमीटरपर्यंत उंचीच्या गणेशमूर्ती सुरक्षा नियमांचे पालन करून मेट्रोतून नेता येणार आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविक घराबाहेर पडतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मेट्रो सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भाविकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

त्यामुळे यंदा मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांना भेट देण्याचा प्लॅन असेल, तर मेट्रो-3मुळे ट्रॅफिकची चिंता कमी होणार आणि रात्री 12 वाजेपर्यंत परतीचा प्रवासही करता येणार आहे.



हेही वाचा

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील पहिली 10 हजार घरं कधी तयार होणार?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा